भाजपाची सत्ता असताना नामांतराचा प्रस्ताव का नाही पाठवला? राम कदमांच्या प्रश्न

- शिवसेना तेव्हा गोट्या खेळत होती का?

औरंगाबाद :- औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या (Aurangabad Municipal Corporation) तोंडावर औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून भाजपा-शिवसेना (BJP-Shivsena) यांच्यात वाद सुरु झाला आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसचा संभाजीनगर नामांतरणाला विरोध आहे. या संदर्भात भाजपासोबत सत्तेत असताना हा प्रस्ताव का पाठवला नाही? तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का? असा प्रश्न भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केला आहे.

राम कदम म्हणालेत, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. भाजपासोबत पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी औरंगाबादच्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्याकाळात शिवसेनेने ‘संभाजीनगर’चा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे का पाठवला नाही? हा खरा प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता शिवसेनेला पुन्हा हा मुद्दा उपस्थित करावासा वाटतो आहे. काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER