मी या क्षणी तयार, मात्र तुमचे मंत्री नार्को टेस्ट करणार का?, राम कदमांचे काँग्रेसला आव्हान

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput death case) सत्तापक्ष आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत. एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणावरून भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला होता. आता त्याच राम कदमांना काँग्रेसनं लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी राम कदमांवर गंभीर आरोप केले आहेत.

ही बातमी पण वाचा: मोठी बातमी : रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा एनसीबीच्या ताब्यात

विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग्ज विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. यावर आता राम कदम यांनी सचिन सावंत यांनाच थेट आव्हान दिले आहे. ‘छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते , मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा’ असे आव्हान कदम यांनी दिले आहे.

तसेच, सुशांतसिंगराजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया याना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला . या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिलीं हेच सरकारच्या जीव्हारी लागल! असा खोचक टोलाही त्यांनी आघाडीच्या नेत्यांवर लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER