राम मंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे,’धाराशिव’, ‘संभाजीनगर’च्या नामांतराची तारीख कधी सांगणार? – राम कदम

Ram Kadam

मुंबई :  राम मंदिरनिर्माणाची (Ram temple construction) तारीख विचारणारे धाराशिव संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार? असा टोमणा भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेला मारला. कारण, राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित असताना शिवसेनेसह महाआघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्ष भाजपाला ‘मंदिर वही बनाएँगे लेकिन, तारीख नहीं बताएँगे’ म्हणून टोमणे मारत होते.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत धाराशिव- उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये उस्मानाबादचा ‘धाराशिव’ उल्लेख करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारत टोमणा मारला, “राम मंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार? सत्ता तुमची आहे, कोणी अडवले तुम्हाला? की निवडणुका जवळ आल्या की फक्त नौटंकी? ज्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयात निर्णय प्रलंबित केला त्यांच्यासोबत सत्ता?” असे सवाल राम कदम यांनी केले. हेच का तुमचे हिंदुत्व असा प्रश्नही केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER