
मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या ‘बॉस’ला हे अजूनही जमत नाही, असा टोमणा भाजपाचे (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी शरद पवारांना मारला.
हकीगत अशी की, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. यानंतर, पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारलेला प्रश्न टाळताना शरद पवार म्हणाले होते – ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू ?
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेची निवडणूक पुणे येथून लढवली आहे.
याला चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले होते – माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर हारण्याच्या भितीने तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला