
मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेना (Shivsena) अडचणीत आली असताना, गृहमंत्रालय राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादीचीही फरफट सुरू आहे. त्यामुळे बिथरलेली राष्ट्रवादी (NCP) भाजपवर (BJP) टीका करून बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करते आहे.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. यावर भाजपाचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी प्रत्युत्तर दिले – “राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?,”
राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत‘ आहे.
एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का? https://t.co/jVcPuG11qy— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) March 19, 2021
देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी
सचिन वाझे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राज्य सरकारकडून मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला