विधिरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही- अनिल परब

Ram Kadam - Anil Parab

मुंबई : “विधिरत्न राम कदम (Ram Kadam) यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही. कंगना रणौतने केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली आणि कदमांनी राज्य सरकारने सुरक्षा का दिली नाही, असं ट्विट केलं.” म्हणजे राम कदम यांना केंद्र आणि राज्यातला फरकसुद्धा कळत नाही, असा टोला शिवसेनेचे (Shiv Sena) नेते अनिल परब यांनी लगावला.

अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली आहे. एकीकडे भाजपचे (BJP) काही नेते कंगनाचं समर्थन करत आहेत, तर शिवसेनेचे नेते कंगनावर सडेतोड टीका करत आहेत.

भाजपचे नेते राम कदम यांनी कंगना रणौतच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याने या प्रकरणाला भाजपा विरुद्ध शिवसेना असे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) आत्महत्या चौकशी प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता थेट शिवसेना विरुद्ध कंगना इथपर्यंत येऊन ठेपला आहे. परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी काल माध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच राम कदमांवरही निशाणा साधला.

“सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हातात जाऊन आता १५ दिवस झाले आहेत. या १५ दिवसांत कंगना रणौतने कुठल्याही प्रकारची अधिकृत सुरक्षा सीबीआयकडे मागितली नाही किंवा त्यांच्याकडे असलेली माहिती सीबीआयला दिलेली नाही. केवळ वातावरण खराब करण्याच्या अनुषंगाने ती ट्विट करत राहते.” असं म्हणत अनिल परब यांनी कंगनाला सुनावलं.

जो महाराष्ट्र आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्या मुंबई पोलिसांची, सरकारची, महाराष्ट्राची वारंवार बदनामी करून त्यांना महाराष्ट्र किती खराब आहे, अशा प्रकारचे वातावरण तयार करायचे आहे. आतापर्यंत असेच मुंबईला बदनाम करून मुंबईतील वित्तीय केंद्र गुजरातमध्ये गेले. बरीचशी कार्यालये गुजरातमध्ये हलवली, अशा प्रकारचे वातावरण करून मुंबईचे (Mumbai) बॉलिवूड (Bollywood) इतर कुठे हलवण्याचा कट तर शिजत नाही ना? मुंबईत स्थिरस्थावर झालेल्या परप्रांतीयांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न तर नाही ना? अशा प्रकारचे एक-एक उद्योग मुंबईतून काढण्याचे कारस्थान तर चालू नाही ना, असे अनेक प्रश्न आता समोर उभे राहात असल्याचेही परब म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ज्या राज्यावर विश्वास आहे तिथं राहा; अनिल परब यांनीही कंगनाला खडसावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER