देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो का?, राम कदम यांचा ऊर्जामंत्र्यांना उलटप्रश्न

Ram Kadam-Nitin Raut

मुंबई : देशाच्या १३० करोड जनेतेने एकाच वेळी दिवे बंद केल्याने ग्रीड फेल झाले तर तांत्रिक बिघाड निर्माण होऊ शकतो. देशातील विजपुरवठ्यात अडथळा येऊ शकतो. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा आणि आवश्यक तितके लाईट चालू ठेऊन, दिवे किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उलटप्रश्न केला आहे.

देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? असा प्रश्न त्यांनी नितीन राऊत याना विचारला आहे. नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांशी आणि अन्य तज्ज्ञांशी चर्चा न करता केवळ अभ्यासपूर्ण व्हाट्स अ‌ॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो की बंद करुन झोपतो? यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो, असा टोला राम कदम यांनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची सद्यस्थिती ही वेगळी आहे. विजेची मागणी ही २३,००० मेगावॅट वरून १३,००० मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्रीयल लोड हा झिरो आहे. १३,००० मेगावॅट ही फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती वापरासाठी वापरली जात आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रिड फेल होईल. सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल. असे मत नितीन राऊत यांनी शुक्रवारी केले होते.

आवश्यक तितके लाईट चालू ठेवून मेणबत्ती, दिवे इत्यादी लावा- डॉ. नितीन राऊत