राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याला सुरुवात

अयोध्या : केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे ज्या ऐतिहासिक सोहळ्याची वाट पाहत होते, त्या अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरूवात झाली आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत.

या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच त्या व्यक्तीला भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रीतही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

राममंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER