रामगोपाल वर्माने महिमा चौधरीला न सांगता ‘सत्या’तून काढून अपमान केला होता

ramgopal verma - Mahima Chaudhry - Maharastra today
ramgopal verma - Mahima Chaudhry - Maharastra today

बॉलिवूडमध्ये एखाद्या नव्या नायिकेला मोठ्या बॅनरने किंवा मोठ्या दिग्दर्शकाने लाँच केले की तिच्याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष जाते आणि तिला साईन करण्यासाठी काही निर्माते पुढे सरसावतात. मात्र नंतर ही नायिका यशस्वी झाली तर तिला पुढे कामे मिळतात नाही तर जे निर्माते साईन करण्यासाठी पुढे सरसावलेले असतात ते मागे फिरतात. एवढेच नव्हे तर ज्यांनी साईन केलेले असते तेसुद्धा नायिकेला अलगद सिनेमातून बाहेर फेकून देतात आणि तिला कळवण्याची तसदीही घेत नाहीत. असाच काहीसा प्रकार प्रख्यात अभिनेत्री महिमा चौधरीबाबतही (Mahima Chaudhry) घडला होता. स्वतः महिमानेच ही गोष्ट आता सांगितली आहे.

महिमा चौधरीने १९९७ मध्ये शाहरुख खानची नायिका म्हणून सुभाष घई यांच्या ‘परदेस’ (Pardes) सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. हा सिनेमा बऱ्यापैकी हिट झाल्यानंतर महिमाने ‘दाग: द फायर’, ‘प्‍यार कोई खेल नहीं’, ‘धड़कन’ सिनेमे केले. पण नंतर ती लगेचच गायब झाली. अर्थात याला कारण होते तिला झालेला अपघात आणि त्या अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावर पडलेले व्रण. महिमाने एका मुलाखतीत अनेक गंभीर गोष्टी उघड केल्या आहेत. महिमाने सांगितले, राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) ने ‘सत्‍या’ (Satya) सिनेमासाठी तिला साईन केले होते. ‘राम गोपाल वर्माबरोबर माझी भेट ‘परदेस’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी त्याने ‘सत्‍या’ सिनेमाबाबत माझ्याशी चर्चा केली. सिनेमाची स्‍क्र‍िप्‍ट मला खूपच आवडली होती आणि त्यामुळे मी लगेचच सिनेमाला होकार दिला. त्यावेळी अनेक मुलाखतींमध्ये मी रामगोपाल वर्माच्या या सिनेमाबाबत बोललेही होते. परंतु सिनेमा जेव्हा सुरु झाला तेव्हा मला कळले की माझ्याजागी उर्मिला मातोंडकरला घेण्यात आले आहे. मला सिनेमातून काढून टाकण्यात आल्याचे कळवण्याची तसदीही रामगोपाल वर्माने घेतली नाही. हे खूपच दुःखदायक आणि अपमान करणारे होते.

महिमाने या मुलाखतीत अजय देवगणसोबतच्या (Ajay Devgn) नात्याबाबतही स्पष्ट केले. महिमा म्हणते, १९९९ मध्ये ‘दिल क्या करे’ सिनेमाचे शूटिंग करताना माझ्या कारचा अॅक्सीडेंट झाला. या अॅक्सीडेंटनंतर मी शारीरिक आणि मानसिकरित्या खचून गेले होते. पुन्हा मी काम करू शकेल असा मला विश्वासच वाटत नव्हता. मला चेहऱ्यावर जखमा असलेली scarface म्हणून चिडवले जात असे. यावेळी सगळ्यात जास्त मदत मला अजय देवगणने केली. मात्र लोकांनी माझे आणि अजय देवगणचे अफेअर असल्याची चर्चा सुरु केली. याचाही माझ्या करिअरवर खूप परिणाम झाला. अशी आठवणही महिमाने सांगितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button