रकुल प्रीतलाही कोरोनाची लागण

Rakul Preet Singh - Corona Positive

कोरोनाने (Corona) सगळ्या जगाला ग्रासलेले आहे. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून सर्व प्रकारची काळजी नागरिक घेतात. गरीब आणि मध्यमवर्गियांना काळजी घेणे अनेक गोष्टींमुळे जमत नाही. दुसरीकडे श्रीमंत आणि बॉलिवुड कलाकारांना सर्व सोयी उपलब्ध असतात आणि ते कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजीही घेतात तरीही त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत आहे. बॉलिव़ुडमध्ये (Bollywood) अगदी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यापासून ते वरुण धवनपर्यंत (Varun Dhawan) अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात आता रकुल प्रीतचाही समावेश झाला आहे, स्वतः रकुलनेच कोरोनाचा अहवाल पॉझिटव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) अभिनेता अजय देवगण द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित ‘मेडे’ सिनेमाचे हैदराबादमध्ये शूटिंग करीत होती. या सिनेमात अजय देवगण, अमिताभ बच्चन, अंगीरा धरा आणि आकांक्षा सिंह यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचे शूटिंग करीत असतानाच रकुलला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच रकुल मुंबईला परतली असल्याचे सांगितले जात आहे. रकुल प्रीत सिंह बॉलिवुडमधील नव्या दमाची नायिका असून तिने यारियां, दे दे प्यार दे और मरजावां सिनेमात काम केलेले आहे.

रकुलने मंगळवारी ट्विटच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाली असून सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले आहे. ट्विटरवर रकुलने लिहिले आहे, ‘मी सांगू इच्छिते की माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक असून सध्या आराम करीत आहे. लवकरात लवकर शूटिंगसाठी मी परतणार आहे. गेल्या काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी. सगळ्यांचे धन्यवाद आणि सुरक्षित रहा. रकुलचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

ही बातमी पण वाचा : बॉलिवुडमधील मोठ्या नायकांचा प्रियांकासोबत काम करण्यास नकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER