भावांनो….. या रक्षाबंधनला बहिणीला फक्त ‘गिफ्ट’ नाही तर द्या ‘बंच आफ गिफ्ट्स’

rakshabandhan

रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणारा दिवस. या दिवशी हक्काने बहिणी आपल्या भावाला भेट वस्तू मागतात. मघ अशा वेळेस गोंधळ होतो की बहिणीला काय गिफ्ट द्यावे?? नौकरी करणारे भाऊ तर आपल्या बहिणीसाठी मोठ- मोठे भेट वस्तू खरीदी करतात. परंतु जे काॅलेज मध्ये आहेत किंवा नौकरी करीत नाही त्यांनी कोणती भेट वस्तू खरीदी करावे असा प्रश्न त्यांना नक्कीच पडत असणार. म्हणून त्यांच्या साठी आम्ही अश्या गिफ्ट आईडिया घेऊन आलो आहोत ज्या मध्ये तुम्हाला जास्त खर्च देखील करावे लागणार नाही आणि तुमच्या बहिणीलाही पसंत पडेल. बहिणीला मोठ- मोठे गिफ्ट देण्यापेक्षा रोजच्या उपयोगात आणणारे वस्तू गिफ्ट करा.

  • rk- nail paintनेल-पेंट :- मुलींना सर्वात जास्त आवड आहे तर नेल-पेंट ची. तुम्ही नेल-पेंट चे ५ वेगवेगळ्या कलरचे शेड त्यांना गिफ्ट करा. खुश होतील.

  • की चेन :- हल्ली प्रत्येक मुलींकडे त्यांची स्वतःची मोपेड असतेच. मघ नवे की-चेन तुमच्या बहिणीला नक्की आवडेल.

  • बँगल :- वेगवेगळ्या बँगल चा कलेक्शन प्रत्येक मुलींना आवडते. तर हा ऑप्शन गिफ्ट साठी बेस्ट राहील.

  • rk- braceletब्रेसलेट :- रोजच्या डेली विअर साठी ब्रेसलेट देखील एक चांगला ऑप्शन राहील.

  • स्काॅर्फ :- स्काॅर्फ घेणे तर आता फॅशनच झाली समझा. या मध्ये तुम्हाला भरपूर वेरायटी मिळेल.

  • झुमके :-  प्रत्येक मुलींना हवे असते झुमके. सण असो किंवा लग्न झुमक्या शिवाय गेट अप हे अपूर्णच म्हणावे.
  • फिंगर रिंग :-  ब्रेसलेट,बांगड्या हे सर्व ठीक आहे. पण एक सुशोभित फिंगर रिंग हाताची शान वाढविते. आपल्या बहिणीला फिंगर रिंग नक्की द्या.
  • rk- clutcherक्लचर :- क्लचर मध्ये भरपूर वेरायटी असतात. तुम्ही या मध्ये छोटे आणि मोठे कल्चर निवडू शकता.

  • टिकल्यांचा पॅकेट :-  आजकाल मुली वेस्टर्न पेक्षा इंडियन ट्रेंड ला जास्त प्राधान्य देतांनी दिसत आहेत. आणि इंडियन लुक वर टिकली तर हवीच ना..

वरील साऱ्या वस्तूंना छान कलरफुल पेपर ने रॅप करा आणि एका बाॅक्स मध्ये या वस्तूंना ठेऊन एक बुके तयार करा आणि आपल्या लाडक्या बहिणीला या रक्षाबंधनला गिफ्ट करा.