
मुक्ताईनगर : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. बिलात सवलत मिळावी या मागणीसाठी भाजपाच्या खासदार व एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी मुक्ताईनगर येथे तहसील कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करून नाकर्त्या राज्य सरकारचा निषेध केला.
लॉकडाऊन काळात वापरलेल्या विजेचे वाढीव बिलात विचार करून ग्राहकांना सवलत देऊ असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी राऊत यांनी वीजबिलात कोणतीही सवलत मिळणार नाही असे सांगितले आहे.
यानंतर, भाजपासह मनसे व इतर संघटना राज्य सरकार विरोधात आक्रमक झाल्या असून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
भरमसाट वीजबिल आकारून जनतेची फसवणूक करणाऱ्या नाकर्त्या राज्य सरकारच्या विरोधात मुक्ताईनगर येथे तहसील कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी डॉ.राजेंद्र फडके, श्री.अशोक कांडेलकर, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.#महाआघाडीवीजघोटाळा #MVAPowerScam pic.twitter.com/ZCU44w58x7
— Raksha Khadse (@khadseraksha) November 23, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला