मुक्ताईनगरमध्ये सासरे विरुद्ध सून; ग्रामपंचायत निवडणुकीत रक्षा खडसेंचं एकनाथ खडसेंना आव्हान

Raksha Khadse vs Eknath Khadse.jpg

जळगाव : भाजपाला रामराम ठोकत जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला . मात्र, त्यांचीच सून असलेल्या रक्षा खडसे (Raksha Khadse) अद्यापही भाजपमध्येच आहेत . ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये सासरे विरुद्ध सून अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगरमध्ये 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. आणि यामध्ये ग्रामपंचायती जिंकण्याची जबाबदारी भाजपकडून (BJP) रक्षा खडसेंवर असेल, तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर ती जबाबदारी एकनाथ खडसेंवरच येणार आहे. त्यामुळंच या निवडणुकीत चुरस वाढली.

एकनाथ खडसे हे मूळचे मुक्ताईनगरमधील कोथळी या गावचे. त्यांच्या गावातही यंदा निवडणुकी लागल्या आहेत. आतापर्यंत खडसेंच्याच पक्षाला या गावानं निवडल्याचा इतिहास आहे. त्यामुळं आधी भाजपनं इथं सत्ता मिळवली. मात्र, यंदा ही सत्ता राष्ट्रवादी आणि महाविकासच्या पारड्यात जाणं निश्चित मानलं जाते आहे. मात्र, त्यातच रक्षा खडसेही इथं जोर लावणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान जळगावातील 783 ग्रमपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यात मुक्ताईनगरच्या 51 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना मागील निवडणुकांत 48 ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER