रक्षा खडसे ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

Raksha Khadse

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे  भाजपसोबतची (BJP) मैत्री तोडून राष्ट्रवादीत (NCP) दाखल झाले असले तरी सूनबाई खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपत आहेत. रावेरच्या त्या भाजपच्या खासदार आहेत. त्यांनी  ठाकरे सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) येत्या ९ तारखेला ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) रस्त्यावर उतरणार आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांना घेऊन रक्षा खडसे यांनी आंदोलन पुकारले आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बोलत असते; परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरली, तरी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी जळगाव भाजपतर्फे रक्षा खडसे ९ नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मागणी करूनही राज्य सरकार लक्ष देत नाही.

इतर जिल्ह्यातील मंत्री हे त्या ठिकाणी जाऊन पॅकेज घोषित करत आहेत, मग जळगावात का नाही? असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक २०१९ या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही, असा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रक्षा खडसे यांचे सासरे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. पक्षबदलानंतर खडसेंच्या पदरी नेमकं काय पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून खडसे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER