मी पाहिले तेव्हा असे काही नव्हते; तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता- रक्षा खडसे

Raksha Khadse

जळगाव : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर (BJP official website) भाजपच्याच खासदार यांच्या नावासमोर त्यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचे आढळून आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, भाजपने ही चूक तातडीने सुधारली होती. त्यानंतर हा स्क्रीन शॉट वा-यासारखा व्हायरल झाला.  त्यामुळे भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) दुखावल्या आहेत. रक्षा खडसे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या संकेतस्थळावर झालेल्या चुकीच्या प्रकाराबाबत मत मांडले.

‘झालेला प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कुणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती. एका महिला खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. त्यामुळे दु:ख वाटले.’ अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. ‘या प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे, पक्षसुद्धा यावर खुलासा करणार आहे.

जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे’ असंही रक्षा खडसे म्हणाल्या. भाजपच्या वेबसाईटवर हे दिसले आहे, मग चूक  कुणाची असावी? असे  विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘जेव्हा मी पाहिलं त्यावेळी मला असं काही दिसलं नाही. त्यावेळी ते रावेरच होतं. पण काही जणांचं म्हणणं होतं की रावेरचं हिंदी ट्रान्सलेट केल्यावर तसा शब्द वापरला गेला.

ही बातमी पाहिल्यानंतर मी भाजपची अधिकृत वेबसाईट चेक केली होती. त्यावेळी मला असं काही दिसलं नाही. पण काही जणांनी पेजचे स्क्रीन  शॉट काढून फोटोशॉपने केले असेल, असा माझा अंदाज आहे.

’असंही रक्षा खडसे म्हणाल्या. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे भाजपला तातडीने हटवण्याची विनंती केली होती. तसंच या प्रकरणी कारवाईचा इशारासुद्धा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER