राखी म्हणे, जावेद अख्तर तिच्या जीवनावर सिनेमा बनवू इच्छितात

Rakhi swant- Javed Akhtar

राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने मीडियात चर्चेचा विषय असते. कधी कधी ती एखादा वाद निर्माण करते तर कधी काहीही बोलते आणि चर्चेत येण्याचा प्रयत्न करते. यात अगदी मिका सिंहसोबतच्या चुंबनाचा विषय असो वा आता बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लग्न केल्याचा विषय असो. राखी काही ना काही तरी खाद्य मीडियाला देतेच. कधी ती अंगावर पाकिस्तानचा झेंडा घेते तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांचा फोटो असलेला ड्रेस घालते. त्यामुळेच तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनही म्हणतात. बिग बॉसमध्ये राखीने कमालच केली होती, पण बिग बॉसचे टायटल मात्र ती जिंकू शकली नव्हती. आता एका मुलाखतीत राखीने जे म्हटले आहे ते ऐकून तिचे हे वाक्य पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जाऊ लागला आहे.

मुलाखतीत बोलताना राखीने म्हटले, बॉलिवूडमधील एक प्रख्यात लेखक तिच्या जीवनावर सिनेमा लिहू इच्छित आहेत. आणि हे लेखक दुसरे तिसरे कोणी नसून जावेद अख्तर आहेत. यासाठी जावेद अख्तर यांनी फोन केल्याचा दावाही राखीने केला. राखीने सांगितले, कोरोनाचा संसर्ग सुरु होण्यापूर्वी जावेद अख्तर यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या जीवनावर कथा लिहिण्याची इच्छा व्यक्त केली आणि यासाठी भेटायचे असल्याचेही सांगितले. मात्र कोरोनामुळे सगळेच बंद असल्याने त्यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. आणि आजवरही भेट झालेली नाही असेही राखीने म्हटले.

राखी म्हणते, तिची जीवनगाथा प्रचंड वादग्रस्त ठरण्याची शक्यता असल्याने प्रेक्षक ती पाहायला येतील असे मला वाटत नाही.. तुझी भूमिका कोणी करावी असे तुला वाटते असा प्रश्न राखीला विचारला असता राखीने म्हटले, आलिया भट्ट माझी भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारू शकेल. आलिया नाही तर प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण किंवा करीना कपूर माझी भूमिका करू शकतील. नाही तर मी आहेच. जर हा सिनेमा तयार झाला तर मलाच माझी भूमिका करायला आवडेल असेही राखीने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER