राकेश टिकैत यांच्या वाहनावर हल्ला!

Rakesh Tikait

राजस्थान : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. हरसोरा गावातून राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांचा ताफा बनसूर येथे जात असताना हल्ला करण्यात आला. भाजपाच्या (BJP) गुंडांकडून हल्ला करण्यात आला.

हा लोकशाहीचा मृत्यू आहे, असा संदेश टिकैत यांनी दिला. हरसोरा येथील सभा आटोपून टिकैत हे बनसूर येथे जात होते, त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनात टिकैत हे महत्त्वाचे नेते आहेत. टिकैत म्हणाले की, “कृषी कायदे पूर्णत: मागे घेईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहील. २६ जानेवारीला आंदोलकांवर दाखल केलेल्या खटल्यांना शेतकरी घाबरत नाहीत.

सरकार कायदे रद्द करून हमी भावाची कायदेशीर हमी देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. सरकारला असे वाटत आहे, उन्हाळ्यात शेतकरी घरी निघून जातील. त्यामुळे हे सरकार वेळकाढूपणा करत आहे. पण, आम्ही कुठेही जाणार नाही. नोव्हेंबर, डिसेंबर उजाडला तरी आंदोलन सुरूच राहील. आधी वाटायचे हिवाळ्यात आंदोलन मागे घेतील, पण तसे झाले नाही. आताही पंखे वगैरे सोयी तेथे आहेत.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button