राकेश पाटील हत्या प्रकरण; बाळा नांदगावकरांनी घेतली राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट; राज ठाकरेंकडूनही सांत्वन

Rakesh Patil - Bala Nandgaonkar - Raj Thackeray

मुंबई : अंबरनाथ शहरात बुधवारी मनसेचे (MNS) शहर उपाध्यक्ष राकेश पाटील (Rakesh Patil) यांची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. यापार्श्वभूमीवर पाटील यांच्या कुटुंबीयांची मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आज भेट घेतली. यावेळी पाटील यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीसुद्धा राकेश यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह राजू पाटील यांनी आज दुपारी अंबरनाथ गावातील राकेश पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा फोनवरून पाटील कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. राकेश पाटील यांच्या हत्येमागे नेमकं काय कारण होतं?, हे शोधून काढण्यासोबतच आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी बाळा नांदगावकर म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER