काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यातहि परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. सर्वसामान्यप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव (Rajeev Satav) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे चिंता व्यकत करण्यात येत आहे .

तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईहून लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला पुण्याला बोलवण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

दरम्यान राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button