इंधनदरवाढीवरून गदारोळ राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

Rajya Sabha - Fuel Prices

नवी दिल्ली : देशातील इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. पीठासीन सभापतींनी चर्चेला अनुमती न दिल्याने गदारोळ झाला. आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

गदारोळामुळे सुरूवातीला ११ वाजेपर्यंत, नंतर १ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले. विरोधकांनी या विषयावर अत्यंत तीव्र भावना व्यक्त करून इतर कामकाज बंद पाडले.

गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती सतत वाढत आहेत. यावर त्वरित चर्चा घेण्याची मागणी विरोधी सदस्यांनी केली पण पीठासीन सभापतींनी त्याला नकार दिल्याने सदस्यांनी गदारोळ केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER