कोरोना; राज्यसभेच्या निवडणुका लांबणीवर, निवडणूक आयोगाचा निर्णय

Rajya Sabha Election

नवी दिल्ली : देशात करोनामूळे हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्य सभेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या २६ मार्च रोजी पार पडणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून अद्याप या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती पाहूनच नव्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगान स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जागा बिनविरोध असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शपरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंशराय नारायण सिंह यांच्यासह३७ जण बिनविरोध राज्यसभेवर जाणार आहेत. महाराष्ट्रातील सात, तामिळनाडूतील सहा, हरयाणा, छत्तीसगढ आणि तेलंगणमधील प्रत्येकी दोन, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी पाच आणि हिमाचल प्रदेशमधील एक जागा बिनविरोधात निवडून आली आहे.