मार्शल नसते तर राज्यसभेच्या उपसभापतींची हत्या झाली असती; गिरिराज सिंह भडकले

Rajya Sabha Deputy Speaker - Giriraj Singh

नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश (Harivansh) यांच्यासमोर केलेल्या गैरवर्तनावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी विरोधी पक्षातील खासदारांवर जोरदार टीका केली. म्हणाले की, तिथे मार्शल नसते तर त्यांनी हरिवंशजी यांची हत्या केली असती.

त्यांचा जीवही गेला असता. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सिंह म्हणाले की, राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांनी ज्या प्रकारचे वातावरण निर्माण केले होते, त्यावरून असं वाटत होतं की, राज्यसभेच्या उपसभापतींची हत्यादेखील होऊ शकते.

लोकशाही आणि तिच्या घटनात्मक संरचनेवर हल्ला
ते म्हणाले की, रविवारी केवळ बिहारच्या मुलावरच हल्ला झाला नाही तर हा हल्ला लोकशाही आणि त्याच्या घटनात्मक संरचनेवर करण्यात आला. ज्या नियमांनुसार ते निवडून संसदेत पोहोचल आहेत ते नियम त्यांनी तुडवले. तिथे मार्शल नसते तर त्यांनी हरिवंशजी यांची हत्या केली असती. त्यांचा जीवही गेला असता.

हरिवंशजी हे फक्त बिहारचेच नाही तर ते लोकनायक जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan) यांचे अनुयायीदेखील आहेत. त्यांनी चंद्रशेखरजी यांच्याबरोबर काम केले आहे. ते पत्रकारदेखील होते. ते जेव्हा राज्यसभेत निवडून आले तेव्हा त्यांना उपसभापती म्हणून नियुक्त करण्यात आले. ते संयम आणि घटनात्मक संरचनेचे प्रतीक आहेत. विरोधकांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर बिहार याचा नक्कीच सूड उगवेल.

हे लोक शहरी नक्षलवादीचे एक नवे रूप आहेत. नक्षलवादी काय करतात? लोकांना ठार मारतात आणि मग म्हणतात की, ते गरीब लोकांच्या कल्याणासाठी आवाज उठवत आहेत. कोणत्या लोकशाहीमध्ये असे घडते ? देश त्यांना कधीच माफ करणार नाही, असे गिरिराज सिंह म्हणालेत. गिरिराज सिंह यांनी राज्यसभेतील गदारोळाला ‘अर्बन नक्षलवादी’ म्हटल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

रविवारी राज्यसभेत कृषी सुधारणांशी संबंधित विधेयक मंजूर होत असताना विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. यानंतर सोमवारी सत्ताधारी पक्षाने आणलेला निलंबन प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER