आंदोलक खासदारांना उपसभापती हरिवंश यांनी स्वतः दिला चहा

Harivansh

मुंबई : कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रासाठी सोमवारी निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर निलंबित खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या खासदारांनी काल रात्रभर हे आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश (Harivansh) यांनी स्वतः या त्यांना चहा दिला. उपसभापतींच्या कृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी (PM Modi) त्यांचे कौतुक केले आहे. “ वैयक्तिकरीत्या त्या लोकांना चहा देणं, ज्यांनी काही दिवस अगोदरच त्यांचा अपमान केला होता व जे धरणे आंदोलन करत आहेत. हे दिसते की, हरिवंशजी किती विनम्र आणि मोठ्या मनाचे आहेत.

यावरून त्यांच्यात महानता दिसते. मी भारताच्या सर्व नागरिकांसह हरिवंशजी यांचे अभिनंदन करतो.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे. खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे राज्यसभेत सोमवारीही गदारोळ झाला. त्यामुळे कामकाजाविना सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर निलंबित खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत. रात्रभर आंदोलन करणार आणि निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करत राहणार, असे खासदारांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER