राजुरा-विरूर वनपरिक्षेत्रात वाघाने केले एकाला ठार; २१ महिन्यांत आठवा बळी

Rajura - One killed by tiger in Virur forest reserve.jpg

मुंबई : मध्य चांदा वन विभागातील राजुरा वनपरिक्षेत्रात (Rajura Forest Reserve) सोमवारी सायंकाळी वाघाने हल्ला करून एकाचा बळी घेतला. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. या भागात वाघाच्या हल्ल्यात २१ महिन्यांत आतापर्यंत आठ  जणांचा बळी गेला आहे.

राजुरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक-१७८ मध्ये खांबाडा या गावातील मारुती पेंदोर (७०) हा लाकडं गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. तो घरी न परतल्याने मंगळवारी त्याचा शोध घेण्यात आला. वाघाने हल्ला करून मारुती पेंदोर यास ठार केल्याचे उघड झाले. वाघाने त्याच्या शरीराचा सुमारे ७० टक्के भाग खाल्ल्या होता.

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात वाघाने मागील २१ महिन्यांत आठ बळी घेतले आहेत. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची परवानगी यापूर्वीच मिळाली असून दोनदा मोहिमेची मुदत वाढविण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी याबाबतची मुदत संपल्यावर पुन्हा तिसऱ्यांदा मोहिमेला मुदतवाढ मिळाली आहे. आता मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER