शेतकऱ्यांसाठी महाविकासाकडे विरोधात रस्त्यावर उतरेन; राजू शेट्टींचा इशारा

Raju Shetty

सावंतवाडी : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन ते अद्याप पूर्ण केले नाही. मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला म्हणजे त्यांचं सगळं ऐकलं पाहिजे असे काही नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा पाठिंबा दिला असून महाविकास आघाडीने शेतकऱ्यांबाबत दिलेली आश्वासने पाळली नाहीत तर रस्त्यावर उतरायला ही मागेपुढे बघणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले डॉक्टर जयंत परुळेकर उपस्थित होते शेट्टी म्हणाले पाच वर्षापूर्वी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला होता पण त्यांनीही राज्यात आणि केंद्रात शेतकरी विरोधी धोरण राबविल्याने मी त्यांच्या युतीमधून बाहेर पडलो आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता.

मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने आत्महत्येसाठी निघालेल्या शेतकऱ्याला मिळाला दिलासा

यावेळी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले होते. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सांगूनही आश्वासन पाळले नाही दिलेली कर्जमाफी ही तुटपुंजी आहे. यावर आम्ही समाधानी नाही त्यामुळे आता सरकार विरोधात रस्त्यावरही उतरायला मी मागेपुढे बघणार नाही शेतकरी जगला पाहिजे हे आमचे धोरण आहे. असे शेट्टी यांनी सांगितले तसेच भविष्यात कोकणातील जनतेने वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलन केले तर त्याचे नेतृत्व करेन येथील जनतेने आपल्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे तरच न्याय मिळेल असेही शेट्टी म्हणाले.