राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष मनपाच्या रिंगणात

Raju Shetti - Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा स्वाभिमानी पक्ष कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) निवडणूक रिंगणात उतरणार आहे. पक्षातर्फे सर्व ८१ प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. स्वाभिमानी पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढविणार असल्याची अशी माहिती जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, शहर संपर्क प्रमुख अजित पोवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात अनेक प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. स्वाभिमानी संघटनेची नाळ ग्रामीण भागाशी जोडली असली तरी कोल्हापूर शहराचे ग्रामीण जनतेशी संबध आहेत. काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम संथ गतीने सुरु आहे. रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका आहे. एकही रस्ता व्यवस्थित नाही. कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे.शहरवासीयांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठीच स्वाभिमानी महापालिकेच्या राजकारणात उतरत आहे. महापालिकेच्या सत्ताधारी तसेच विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे, असे कांबळे आणि पोवार यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, करवीर तालूका अध्यक्ष संजय चौगले, आण्णा मगदूम, मनोज चौगले उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER