सक्तीच्या वीज वसुलीविरोधात राजू शेट्टींचे आंदोलन; सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम

Raju Shetty - Maharastra Today

कोल्हापूर : वाढीव वीज बिल आणि त्यानंतर करण्यात येणारी सक्त वसुलीविरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध जिल्ह्यांत आंदोलन करण्यात आले. राज्यभरात सर्वपक्षीय आंदोलनाला कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बुलडाणा आणि वाशिममध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुणे- बेंगलोर महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरण्यात आला. अखेर पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

वाढीव वीज बिल आणि सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात महामार्ग रोको करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीच्या मागणीसाठी कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी तब्बल दीड तासाहून अधिक काळ पुणे-बेंगलोर महामार्ग रोखून धरण्यात आला. राजू शेट्टींनी यावेळी वीज बिलप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER