मरेपर्यंत राजू शेट्टी यांची साथ नाही : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot

सांगली : एक काळ माझा हात गोड वाटणाऱ्या राजू शेट्‌टी यांना आता तो कडू वाटत आहे, शेट्टींनी ज्या चोरांशी संगत केली. त्याचा हा परिणाम आहे. मी मरेपर्यंत कधीही शेट्‌टींसोबत जाणार नाही, असा पलटवार रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी आज केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्‌टी यांनी सदाभाऊ खोत यांना समिती नेमून संघटनेतून काढून टाकले आहे. आता पुन्हा प्रवेश नाही अशी बोचरी टीका केली होती. त्यावर पलटवार करताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, काही प्रसार माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी पुन्हा मैत्रीसाठी त्यांच्याकडे हात केलेला नाही. मी एवढेच म्हणालो होतो की, त्यांनी जर अलीबाबा आणि 40 चोर यांची संगत सोडली, तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आम्ही एकत्र होऊ शकतो.

प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी मी एकत्र येण्याबाबत बोललो होते. मात्र, शेट्‌टींना माझे हात आता बरबटलेले वाटतात. त्यांना आता बारामतीकरांचा आमरस आवडू लागला आहे. त्यामुळे आमचा हात कडू लागत आहे. मला हाकलून देण्याची भाषा त्यांनी केली असल्याने आता एकीचा प्रश्‍नच नाही, पण मी त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी याचना केलेली नाही. ते भ्रमात आहेत. हातकणंगले मतदार संघातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता भ्रमातून बाहेर यावे. आणि या जन्मात तरी त्यांच्यासोबत मी कधीही एकत्र येऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER