राजू शेट्टी यांना उपचारासाठी पुण्याला हलवले

Raju Shetti

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांना बुधवारी दुपारी श्वसनाचा त्रास होवू लागल्याने कोल्हापुरातून पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.

राजू शेट्टी हे मागील पंधरा दिवसांपासून दुध आंदोलनासाठी मराठवाडासह अनेक ठिकाणी गेले होते. त्यांचा स्वीय सहाय्यक यांना कोरोना लागण झाली होती. त्यांनतर ४ सप्टेंबरला शेट्टी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona report Positive) आला. राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ व पत्नी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सौरभ यांना श्वसनाचा त्रास होवू लागल्याने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालायात ऑक्सिजन लावण्यात आले आहे. पत्नींची प्रकृती स्थिर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER