राजू शेट्टी हे सरकारच्या दावणीला बांधले : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot - Raju Shetti

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सरकारच्या विरोधात आवाज उठवून मोठे झाले. आता तेच त्यांच्या दावणीला बांधले आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करून दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करून दाखवावी, असे आव्हान माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिले. शेट्टी यांचे दूध आंदोलन फेल गेले आहे. प्रत्येक वर्षी ऊस परिषदेचा खेळ करण्यापेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

खोत म्हणाले, हे राज्य सरकार नाटक कंपनीचे आहे. त्यातील मंत्री कलाकार असून ते मंदिरे उघडण्याऐवजी मंदिराची दारे बंद केली आहेत. गेल्या ७० वर्षांतील सरकारला जे जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

सरकारने कोरोना (Corona) काळात रुग्णांना सुविधा दिल्या नाहीत. औषधाचा तुटवडा झाल्याने जनतेला फिरावे लागले. अशा कालावधीत सर्वच मंत्री साहित्य खरेदीत व्यस्त होते. कोरोनाच्या काळात सरकारने जनतेच्या तिजोरीवर दरोडा टाकून कोट्यवधीची लूट केल्याचा आरोप खोत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER