राजू शेट्टी चोरांच्या आळंदीला पोहचले, सदाभाऊ खोतांची टीका

sadabhau khot & Raju Shetti

सांगली : महाविकास आघाडीसोबत असलेले स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) साखरेच्या एफआरपीसाठी २५ जानेवारीपासून आंदोलन करत आहे. यासाठी शेट्टींवर टीका करताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) म्हणालेत की, राजू शेट्टी चोरांच्या आळंदीला पोहचले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना २५ जानेवारीपासून राज्यात एफआरपीच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. सदाभाऊ खोत म्हणालेत, “काही मंडळी साखर कारखान्याच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. अशी मंडळी लोकांना दाखवण्यासाठी साखर कारखानदारांच्या विरोधात नाटकी आंदोलन करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी आंदोलन करण्याऐवजी ऊस शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ते जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं.”

“एकाबाजूला सरकारमध्ये राहून दोन्ही हात तुपात ठेवयाचे आणि दुसऱ्या बाजूला लोकांना दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे. आता ते चोराच्या आळंदीला पोहचले आहेत. त्यांनी आता नाटकं बंद करावीत,”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER