सरकारने आश्वासन पाळावित अन्यथा लोक रस्त्यावर तुडवून मारतील : राजू शेट्टी

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज मुंबईत शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदान येथील आंदोलनस्थळी भेट दिली. राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळावे, अन्यथा लोक रस्त्यावर तुडवून मारतील, अशा शब्दात शेट्टी यांनी यावेळी सरकारवर असूड ओढला.

शेट्टी म्हणाले, सरकारला तीन पाय असो की चार पाय असो सर्वसामान्यांना न्याय नाही दिल्यास कुबड्या घेऊन चालायची वेळ येईल. जेंव्हा जेंव्हा कष्टकरी सर्वसामान्य जनतेवर अन्याय होतो तेंव्हा सरकार कुणाचही असो मी रस्त्यावरच असणार. कोरोनासारख्या संकटाच्या आपत्तीला इष्टापत्ती समजून मास्क , सॅनिटाईझर , व्हेंटिलेटर व वैद्यकीय साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा करून जिथे हात धुता येथील तिथे हात धुवून घेतला.

आर्थिक मंदीतही मंत्र्याची दालने अलिशान करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत मात्र उद्याची पिढी घडविणा-या शिक्षकांना पगार देण्यास पैसे नाहीत हा माझा पुरोगामी महाराष्ट्र आहे, असे शेट्टी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER