आठवड्याभरात लसी द्या; अन्यथा लसीचा एकही थेंब महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या (Corona vaccine) तुटवड्यावरून केंद्रविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्राला आठवडाभरात लसींचा पुरवठा वाढवून मिळाला नाही, तर सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीचा एकही थेंब महाराष्ट्राचा बाहेर पडू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि गृहमंत्र्यांना पत्रही लिहले आहे. आठवडाभरात महाराष्ट्रातील कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी या पत्रात केली आहे. आता भाजपचे नेते राजू शेट्टी यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांवर अन्याय

केंद्र सरकारने नुकताच पुणे शहराला दीड लाख लसींचा साठा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसींचा पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्राचीच नाचक्की होईल. केंद्राच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. राज्य सरकारचेच ऐकले जात नाही, असा संदेश जाईल, असे राऊत यांनी म्हटले.

केवळ पुण्यातील भाजपच्या महापौरांसाठी केंद्र सरकार वेगळा नियम बनवत असेल तर उर्वरित महाराष्ट्रातील लोकांवर अन्याय होईल. पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे आमचे किंवा तुमचे सरकार आहे हे बघून निर्णय घेऊ नका, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button