शेतकऱ्यांचे प्रश्न संपले तर आपण संपू ही राजू शेट्टी यांना भीती : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या विधेयकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारच्या जोखडातून मुक्त केले. परंतु, प्रश्न संपला तर शेतकऱ्यांच्या भावनाना हात घालता येणार नाही. आंदोलने करता येणार नाहीत. शेतकऱ्यांचे नेते हे आपले पद टिकणार नाही, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना वाटत आहे. म्हणूनच शेट्टी या विधेयकांना विरोध करत आहेत, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.

नव्या विधेयकामुळे शेतकरी मार्केट कमिटीच्या जाचातून मुक्त होणार आहे. शेतमाल मार्केट कमिटीच्या बाहेर विकण्याचा अधिकार मिळणार आहे. फार्मर प्रोड्यूसर कंपन्या स्थापन होतील. या माध्यमातून लहान शेतकरी, अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक हे एक एकत्रित येऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन घेतील. कापोर्रेट कंपनी, खरेदीदार यांच्याबरोबर कायदेशीर करार करतील. ई-मार्केटिंगसह साठवणूक व इतर सुविधा निर्माण होईल.

शेतीत मोठ्या प्रमाणात खासगी व विदेशी गुंतवणूक होईल. कोल्ड स्टोअरेज व वेअर हाऊस उभा राहतील. शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग तयार होतील. सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे बाजारपेठेतील भीती नष्ट होईल. शेतकऱ्यांची सुशिक्षित तरुण पिढी मार्केटिंगमध्ये येईल, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER