अर्थ मंत्रालयाकडून मायक्रो फायनान्सबाबत राजू शेट्टी यांच्या तक्रारीची दखल

Raju Shetty-Nirmala Sitharaman.jpg

कोल्हापूर :- मायक्रो फायनान्स (Micro finance) कंपन्यांकडून ग्रामीण भागात महिला बचत गटाकडून (Mahila Bachat gat) अव्वाच्या सव्वा दराने कर्जाच्या व्याजाची वसुली सुरू आहे. बॅंकांचा वार्षिक व्याजदर ८ ते ९ टक्के असताना संबंधित फायनान्स कंपन्यांकडून १६ ते २४ टक्के व्याजदराने वसुली सुरू आहे. व्याजदरात कपात करण्याबाबतच्या मागणी केलेल्या पत्रव्यवहाराला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी रिझर्व्ह बॅंकेकडे (RBI) संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांना व्याजदरात कपात करण्याबाबतचे निर्देश दिले असल्याची माहिती माजी खासदार राजू शेटटी (Raju Shetti) यांना पत्रव्यवहाराद्वारे दिली.

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून जोमात व जादा दराने वसुली सुरू आहे. यावर कोणाचा पायबंद उरलेला नाही. महिला वर्गाला त्रास देऊन त्यांना धमकावून या कंपन्यांकडून वसुली सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बॅंकेशी सरकारशी पत्रव्यवहार करून व्याजदरात कपात करण्याची मागणी केली होती.

यानुसार केंद्र सरकारकडून याबाबत रिझर्व्ह बॅंकेला सूचना दिल्या गेल्या असून जोपर्यंत याबाबत रिझर्व्ह बॅंकेचा खुलासा येत नाही तोपर्यंत कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी व्याज व हप्ते वसूल करू नये व महिला बचत गटांनीही सदरचे हप्ते भरू नये, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER