राजू शेट्टी झाले क्वारंटाईन

Raju Shetty

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी कारोनाचा अहवाल निगेटिव्ह आला, मात्र एचआरसीटी तपासणीत फुप्फुस थोडे बाधित झाले आहे. ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचीच लक्षणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे काही काळ घरीच क्वारंटाईन होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी सोशल मिडीयाव्दारे दिली.

सदिच्छा भेट घेण्यासाठी लोक येत असतात. विविध कारणांसाठी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. त्यामुळे संपर्कात येऊन आपल्या परिवाराला धोक्यात न घालता, फोनवरुन चर्चा करा,उपलब्ध असेन. मला कोरोना पॉझिटीव्हचीच लक्षणे आहेत. कोरोना मान-सन्मान ठेवत नाही तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, माझ्या संपर्कात आल्याने दुस-याला कोरोनाचा संसर्ग झाला तर माझ्या मनावरओझं राहील, त्यामुळेच काही काळासाठी घरी क्वारंटाईन होत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER