कृषी विधेयकाविरोधात उद्या राजू शेट्टी करणार आंदोलन

Raju Shetti

कोल्हापूर : केंद्र सरकारची कृषी विधेयकं मागील दोन दिवसांपूर्वी मंजूर झाली. शेतकरी संघटनांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कृषी विधेयकाला विरोध करत उद्या २५ सप्टेंबरला आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

ही कृषी विधेयकं (Agriculture Bill) फसवी आहेत. यात फक्त अंबानी आणि अदाणी यांचा फायदा असल्याने मोदी सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या घाईत होते. रिलायन्सने काही दिवसांपूर्वी बिग बझार सारखा ग्रुप यासाठीच विकत घेतला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. तसेच हे विधेयक जरी संसदेत मांडण्यात आलं असेल तरी या देशात ६० टक्के शेतकरी वर्ग आहे. तो या विधेयक विरोधात रस्त्यावर उतरतील, अशा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : नव्या कृषी कायद्यांचा वाद कशासाठी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER