क्रिकेट असेशिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं : शिट्टी यांचा आशिष शेलाराना टोला

Raju Shetti-Sharad Pawar-Ashish Shelar

कोल्हापूर : सत्ता सुंदरी हातातून निसटल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमीष्टासारखी झाली आहे. शेलारांच्या ध्यानी मनी फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता एवढचं दिसत आहे. आशिष शेलार माझी अवस्थ्या पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालेली नाही. आम्हाला कोणाचे तुणतुणे वाजवायची सवय नाही. मुंबई क्रिकेट असेशिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं याचे उत्तर शेलारांनी आदी द्यावे, अशी शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आशिष शेलारांचा (Ashish Shelar) समाचार घेतला

आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणून रस्त्यावरची लढाई करत आहोत. आज शेतकऱ्यांची जमीन या कायद्यात जाऊ नये म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. आजच उत्तर प्रदेशमधील वृत्तपत्रात बातम्या होत्या ज्या शेतकऱ्यांच्या घरात दोन जनावरे आहेत. त्यांना अतिरिक्त वीज बिल आकारण्यात येणार आहे. हेच भाजपचे सरकार करत आले आहे. यावर आशिष शेलार गप्प का, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetti ) यांनी केला आहे.

आशिष शेलार काय म्हणाले होते….

विधान परिषदेच्या आमिषासाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी आडत-दलालासाठी तुणतुणे घेऊन उभे आहेत. ते केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात त्यांची वकिली करत आहेत. शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, अशी टीका माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली. शेलार येडेमच्छिंद्र येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी : आशिष शेलार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER