प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजू शेट्टी पुण्यात उपचारासाठी दाखल : प्रकृती स्थिर

Raju Shetti

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना दिनानाथ रुग्णालयात नवीन इमारतीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी दिली.

शेट्टी यांना सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सुरवातीला सांगली येथे खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यावर पुढील उपचारासाठी त्यांना १० सप्टेंबरला पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांती त्यांना १६ सप्टेंबरला घरी सोडण्यात आले होते. कोरोना उपचार घेऊन बरे झाल्यानंतर दीड महिन्यांनी पुन्हा त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी म्हणाले की राजू शेट्टी कोरोनातून बरे झाले आहेत.

परंतू वजन वाढल्याने त्यांना काही प्रमाणात त्रास होत आहे. काळजी घेण्यासाठी त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सौरभ यांनी सांगितले. याचबरोबर त्यांचे तपासणी रिपोर्ट येणार आहेत. यावर उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

.