राजू पाटील कोरोनाबाधित झाल्याचे कळताच मनसैनिक विठू चरणी

ठाणे: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. याची माहिती कळताच आमदाराची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी. ते लवकरात लवकर जनतेच्या सेवेत हजर राहावे या भावनेने डोंबिवलीचे मनसेचे शहर संघटक योगेश पाटील यांनी थेट पंढरपूर गाठत विठुरायाला साकडे घातले. याप्रसंगी त्यांनी विठुरायाचं अभिषेक करत दर्शन घेतले. पाटील यांचे आपल्या नेत्याप्रति असलेल्या निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान राजू पाटील (Raju Patil) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण राज्यातील मनसेमधील युवावर्ग राजू पाटील यांचे चाहते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही युवकांनी त्यांना भरघोस पाठींबा दिला होता. राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER