शरद पवारांचे विश्वासू सहकारी राजू बापू पाटील यांचा कोरोनाने मृत्यू

Raju Babu patil

पंढरपूर :  सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महत्वाचे नेते राजू बापू पाटील (Raju Bapu Patil) यांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. राजूबापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते. तसेच, कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी त्यांचे लहान बंधू महेश यांचेही निधन (Die) झाले होते. शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय कुटुंब म्हणून सोलापूर जिल्ह्यात बापू पाटील कुटुंबाची ओळख आहे.

दिवंगत यशवंतभाऊ पाटील यांच्या कुटुंबातील कोरोनामुळे हा तिसरा मृत्यू आहे. राजू बापू पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पाटील यांच्या निधनाने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राजू बापू पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राजू बापू पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे सभापती होते. या माध्यमातून बापू पाटील यांनी आपले वलय निर्माण केले होते . यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूकदेखील लढवली होती.

राजूबापू यांनी गुळ कारखाना काढून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या शिफारशीवरून, आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांचे वडील दिवंगत यशवंत भाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्षापर्यंत या रयत शिक्षण संस्थेचे सदस्यपद भूषवले होते. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांना या संस्थेवर संधी देण्यात आली होती.

लोकांना सहज भेटणारे आणि या पंचक्रोशीतील जनतेच्या अडीअडचणी तातडीने दूर करणारे नेते म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ही बातमी पण वाचा : साथ सोडणाऱ्या मोहिते पाटील पितापुत्रांना धक्का देण्यासाठी पवारांची मोठी खेळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER