राजस्थान रॉयल्सला हवेत ‘लोन’वर खेळाडू, पण मिळतील का?

Rajasthan Royals

कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गाच्या भीतीपायी परदेशी खेळाडू मोठ्या संख्येने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेत आहेत. अॕडम झम्पा, केन रिचर्डसन, अँड्र्यू टाय, लियाम लिव्हिंगस्टोन अशा खेळाडूंनी खेळायला नकार दिला आहे. त्यामुळे राजस्थान राॕयल्सचा (Rajsthan Royals) संघ भलताच अडचणीत आला आहे. त्यांच्याकडे आता आठ परदेशी खेळाडूंपैकी फक्त चारच उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्यांना खेळाडू उसनवारीवर घेण्याची वेळ आली आहे. सुदैवाने आयपीएलमधील (IPL) लोन विंडो (Players Loan Window) सोमवारीच खुली झाली आहे. त्यामुळे काही खेळाडू आपल्याला लोनवर मिळावेत यासाठी राजस्थान राॕयल्सने इतर संघांशी संपर्क साधला असल्याचे समजते.

राजस्थानच्या संघातील बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत तर बायोबबलमध्ये राहणे आता अशक्य असल्याचे सांगत लियाम लिव्हिंगस्टोन मायदेशी परतला आहे. आॕस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टायनेसुध्दा भारतातील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त करताना वेळीच मायदेशी परतलो नाहीत तर दीर्घकाळ आयसोलेशनच्या फेऱ्यात अडकून पडू या भितीपोटी आॕस्ट्रेलियाची वाट धरली आहे. या घटनानंतर राजस्थान राॕयल्सच्या व्यवस्थापनातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी खेळाडू लोनवर मिळण्यासाठी इतर फ्रँचाईजींना लिहिलेले आहे पण अद्याप काहीच ठरलेले नाही.

आयपीएलच्या नियमानुसार जो खेळाडू एका सिझनमध्ये दोनपेक्षा कमी सामने खेळला असेल तो लोनवर दुसऱ्या संघात जाऊ शकतो पण तो त्याच्या मूळ संघाविरुध्दच्या सामन्यात खेळू शकत नाही. जास्तीत जास्त दोनच खेळाडू लोनवर घेता येतात.त्यात आंतरराष्ट्रीय स्तराचा किंवा अनकॕपड् खेळाडूसुध्दा असू शकतो. जो खेळाडू लोनवर दुसऱ्या संघात आला असेल तो मूळ संघाकडे परत जावू शकत नाही. आणि एखादा संघ तीन पेक्षा अधिक खेळाडू प्रतिस्पर्धींना लोनवर देवू शकत नाही.

आयपीएलमधील ही खेळाडू ‘लोन’ पध्दत युरोपमधील फूटबॉलवर आधारीत आहे.

आयपीएलच्या साखळीचे निम्मे सामने झाल्यावरच ही पध्दत कार्यान्वीत होते. त्यातही तो खेळाडू दोनपेक्षा कमी सामने खेळलेला असावा आणि त्याला आपल्या मूळ संघाविरुध्द खेळता येणार नाही अशी बंधने असल्याने लोनवर आलेला खेळाडू फारच कमी सामने खेळू शकतो हे एक कारण आणि आपल्या तंबूतील एखादा खेळाडू दुसऱ्या संघात गेला तर तो आपली ध्येयधोरणे, डावपेच व रणनिती दुसऱ्या संघाला सांगेल अशी भीती असतेच म्हणून आयपीएलमध्ये आतापर्यंत तरी या पध्दतीला प्रतिसाद मिळालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button