दिवाळीत फटाक्यांवर बंदी, राजस्थान सरकारचा निर्णय

ban crakers-Ashok Chavan

राजस्थान : दिवाळीमध्ये सर्वत्र फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी एन दिवाळीच्या तोंडावर एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी (Ban crackers)घालण्यात आली आहे.

फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे कोरोनाचे रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहता, फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धूर ओकणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोतयांनी ट्विट करत ही माहिती दिली.

गहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना काळात राज्यातील नागरिकांच्या जीवाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आतिशबाजीतून निर्माण होणाऱ्या धुरामुळे कोरोनाबाधितांसोबत हृदय आणि श्वासनाची आजारांनी असणाऱ्या रुग्णांनाही त्रास होतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांनी आतिशबाजी करू नये.

तर गेहलोत यांनी अजून एक ट्वीट करत राजस्थानात दोन मोहिमांची घोषणा केली आहे. कोरोना महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्यातील जनतेची सुरक्षा आम्हाला सर्वतोपरी आहे. बैठकीत ‘नो मास्क- नो एन्ट्री’ आणि ‘शुद्धतेसाठी युद्ध’ या दोन मोहिमांची माहिती घेतली, असं ट्वीट गेहलोत यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER