राजस्थानचा हा क्रिकेटपटू 36 वर्षे वयातच गेला !

राजस्थानच्या (Rajsthan) रणजी विजेत्या संघाचा सदस्य, फिरकी गोलंदाज विवेक यादव (Vivek Yadav) याने वयाच्या 36 व्या वर्षीच आयुष्याच्या खेळपट्टीवरुन बुधवारी जयपूर येथे एक्झिट घेतली. त्याला कोरोनाची (Corona) बाधा झाली असल्याचे काही दिवसांपूर्वीच निष्पन्न झाले होते आणि गेल्या काही वर्षांपासून त्याची कर्करोगाशीही (Cancer) झुंज सुरू होती. विवेक हा 2010-11 मध्ये रणजी (Ranji Trophy) विजेतेपद पटकावलेल्या राजस्थानच्या संघाचा सदस्य होता.

विवेकवर जयपुरातील एका दवाखान्यात उपचार सुरू होते. त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे.

त्याला आतड्यांचा कॕन्सर असल्याचे दोनेक वर्षांपूर्वी निष्पन्न झाले होते. त्यावर उपचार सुरू होते आणि सुधारणा दिसून येत होते. काही दिवसांपूर्वीच केमोथेरपीसाठी गेला असता त्याला कोरोनाची बाधा झालेली असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले पण त्याची प्रकृती ढासळतच गेली अशी माहिती त्याचा मित्र आणि राजस्थानचा रणजीपटू रोहित झालानी याने दिली.

रोहतक मध्ये जन्मलेला हा खेळाडू हृषिकेश कानिटकरच्या रणजी संघाचा नियमीत सदस्य होता. विवेकने 2008 मध्ये राजस्थानसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2010-11 च्या रणजी अंतिम सामन्यात बडोद्याचे चार गडी बाद करुन त्याने राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 2012 च्या आयपीएलसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला घेतले होते पण त्याला एकही सामना खेळायला मिळायला नव्हता. त्याने 18 प्रथम श्रेणी, 8 लिस्ट ए आणि चार टी-20 सामने खेळले होते.

विवेकने आपली अॕकेडमीसुध्दा सुरू केलेली होती आणि भारताच्या 19 वर्षाआतील संघात व आयपीएलमध्ये राजस्थान राॕयल्सच्या संघात स्थान मिळालेला आकाश सिंग हा त्याच्या अकादमीचा खेळाडू आहे. आव्हाने स्विकारण्यासाठी नेहमी तयार चांगला खेळाडू असे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे वर्णन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button