राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन

Madanlal Saini

जयपूर :- राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुख:द निधन झाले ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. सैनी हे राज्यसभेत खासदार होते. सैनी यांच्या निधनानंतर सोमवारी राज्यसभा स्थगित करण्यात आाली.

शुक्रवारी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधराराजे यांनी सैनी यांची भेट घेतली होती. मात्र, खासगी रुग्णालयातही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सैनी यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती, त्यामुळे त्यांना मालवीय नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हि बातमी पण वाचा : हिंदुपणाचा प्रभाव सहअस्तित्व आणि लोकशाही हिताचा – डॉ. अशोक कुकडे