फक्त ९ सैनिक घेऊन पाकिस्तानच्या दोन सैन्य तुकड्यांना धूळ चारणारा राजपूत!

Maharashtra Today

१९४७ साली इंग्रजांनी भारताला स्वातंत्र बहाल करण्याचा निर्णय घेतला. देश स्वतंत्र झाला परंतू दोन तुकडे होऊन. फाळणीनंतर पाकिस्तानचा एकमेव उद्देश काश्मिर जिंकण्याचा होता. अशा परिस्थीत भारतीय वीरांनी काश्मिरची रक्षा जीवाची बाजी लावून केली. पाकिस्तानी सैन्यावर तुटुन पडले. छातीचा कोट केला पण काश्मिवर कोणतंच संकट येऊ दिलं नाही. भारताच्या तिरंग्यातला भगवा रंग ज्या बलिदानाचं प्रतिक आहे त्याच उदाहरण द्यायला भारतीय सैन्यदलातले शेकडो जवान तुम्हाला सापडतील. त्यापैकीच एक होते जदुनाथ सिंग(Jadunath Singh).

देशासाठी या वीर सैनिकानं मुठभर सैन्याच्या तुकडीचं फक्त नेतृत्त्वच केलं नाही तर शौर्याचं प्रदर्शन करत पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं. गोळ्यांचा वर्षाव पाकिस्तानी सैनिकांवर केला. त्यांच्या अभुतपुर्व साहसामुळं पाकिस्तानी सैन्याला अनेकदा माघार घ्यावी लागली. भारतमातेच्या या वीर पुत्रानं लढता लढता मृत्यूला अलिंगन दिलं. अशा या वीर जवानाची कहानी अनेकांना लढायचं बळ देते.

देशभक्तीचं बीज

जदुनाथ सिंग यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ला झाला. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यात. त्यांचे वडील बिरबल राठोड एक गरिब शेतकरी होते. त्यांच्या आईचं नाव होतं जमुना कंवर होतं. जदुनाथ यांनी आपले मोठे भाऊ आणि बहिणींनंतर तिसरे अपत्य होते. त्याचं परिवार जितकं मोठं होतं तितकंच त्यांच्या पुढच्या आर्थिक समस्या जास्तो होत्या. गरिब परिस्थीतीमुळं त्यांना शिक्षण घेता आलं नाही. चौथीपर्यंत शाळा त्यांना शिकता आली.

एकेदिवशी जदुनाथ सिंग यांचे वडील शेतात काम करत होते. ते हनुमानाचे मोठे भक्त होते. गावातले लोकसुद्धा त्यांना ‘हनुमान भक्त’ या नावानं ओळखायचे. वडीलांप्रमाणे जदुनाथसुद्धा हनुमानाचे भक्त होते. ब्रम्हचारी राहण्याची त्यांनी शपथ घेतली होती. लहानपणापासून त्यांच्या मनात देशासाठी काही तरी करण्याची जिद्द होती. लहान वयात त्यांनी गावात कुस्तीला सुरुवात केली. पंचकृषीत त्यांच नाव चांगल्या मोठ्या पहिलवानांच्या यादीत सामील झालं. देशसेवा करण्याचं त्यांच स्वप्न पुर्ण झालं १९४१ साली. जदुनाथ यांना इंग्रजांनी भारतीय सैन्यता भर्ती करवून घेतलं. तेव्हा त्यांच वय होतं फक्त २५ वर्षे. ते राजपुत रेजिमेंटमध्ये भर्ती झाले.

भारत पाकिस्तान युद्ध

सैन्य प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ते बटालियनमध्ये सामिल झाले. १९४२ला त्यांनी ब्रम्हदेशात लढाईतसाठी तैनात झाले. जपानी सैन्याविरुद्ध जदुनाथ यांनी लढा दिला होता. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी शौर्याच प्रदर्शन केलं. यावर खुश होऊन वरिष्ठांनी जदुनाथ सिंगांना बढती दिली ते ‘नाईक’ पदावर पोहचले. पुढं ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानानं त्यांच्या सैन्याची मोठी तुकडी काश्मिवर पाठवली. पुर्ण काश्मिर ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा विचार होता. काश्मिरच्या राजानं भारतात विलिन होण्यास संमत्ती दिली होती. असं असतानासुद्धा पाकिस्तानानं काश्मिरच्या वेगवेगळ्या भागावर हल्ला चढवला.

या परिस्थीती नौशेरा क्षेत्रातल्या ‘टैनधार’ ठाणं वाचवणं सर्वात महत्त्वाचं होतं. श्रीनगर वायुक्षेत्राला नियंत्रण या क्षेत्रावरुन सहज शक्य होतं. पाकिस्तानाची नजर नौशेरावर होती. या ठाण्यावर नियंत्रण मिळवलं तर काश्मिर जिंकण पाकिस्तानासाठी सहज सोप्पी गोष्ट होती. अशातच ब्रिगेडीअर उस्मान यांच्या नेतृत्त्वात १ फेब्रुवारी १९४८ ला भारताच्या ५० पॅराबिग्रेडनं नौशेरावर हल्ला करत पाकिस्तानाला मागं ढकलंल.

नंतर ६ फेब्रुवारी १९४८ रोजी ताइनधर येथील पहारा चौकी नंबर दोनची जबाबदारी नाईक जदुनाथ सिंग यांच्याकडे होते. ती आघाडीची चौकी होती तरीसुद्धा संरक्षणासाठी तिथं फक्त नऊ जवान होते. चौकीचा ताबा मिळविण्यासाठी शत्रुसैन्याने जोरदार हल्ले केले; पण जदुनाथांनी मोठ्या धैर्यानं व धाडसानं नेतृत्वाने मोजक्याचं सैन्यबळावर लष्करी डावपेचांचा उपयोग करून पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं. या चकमकीत नाईक जदुनाथ सिंग यांचे त्यांचे चार जवान जखमी झाले.

पाकिस्तानी सैन्यानं घेतलीली माघार कायमची नव्हती ते पुन्हा परतले. मोठी कुमक घेऊन. जदुनाथ सिंगांनी मोठी शक्कल लढवत अशी रणनिती आखली होती की शत्रु सैन्याला वाटावं शेकडो सैनिक आपला प्रतिकार करत आहेत. बुद्धीच्या जोरावर नाईक जदुनाथ सिंगांन शत्रुसैन्याला नामोहरम केलं; पण या प्रतिकारात सर्व जवान जखमी झाले होते. जदुनाथांचाही उजवा हात दुखावला होता, तरीसुद्धा त्यांनी जखमी स्टेनगनरकडून स्टेनगन स्वतःकडे घेतली. शत्रू पाठीशी येऊन पोहोचला असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची परवा न करता प्रंचंड शौर्यानं, शांतपणानं व धीरानं सहकाऱ्यांना हल्ल्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी केलेला गोळीबार एवढा विध्वंसक होता की, होणाऱ्या पराभवाचे रूपांतर विजयात झालं. शत्रूने आपल्या मृत आणि जखमी जवानांना तिथेच टाकून पळ काढला.

त्यांनी मोठ्या पराक्रमानं खिंड लढवली. भारतीय सैन्याची तुकडी त्यांच्या मदतीला पोहचली. रणभूमीच चित्र बघून सारेच अवाक होते. फक्त नऊ सैनिकांच्या जीवावर त्यांनी पाकिस्तानचे दोन मोठे हल्ले परतवून लावले होते. याच दिवशी ते शहिद झाले. यानंतर त्यांच्या शौर्याला वंदन करत त्यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ देऊन सन्मानित करण्यात आलं. भारतायच्या सार्वभौमत्त्वाची करण्यासाठी मरणाला अलिगंण देणाऱ्या वीर जावानांना सलाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button