राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना भेट नाकारली

Rajnath Singh refuses to meet Chinese defense minister

दिल्ली : शांघाय सहकार्य परिषदेला उपस्थित राहण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आज रशियाला रवाना झाले. या परिषदेत चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी (Chinese defense minister) पँगाँग सरोवराच्या परिसरात चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत, याबाबत अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व सैन्याचे ब्रिगेड कमांडर करणार आहेत. मंगळवारीही कमांडरस्तरावरील बैठक झाली होती.

चीनच्या सैन्याने २० – ३० ऑगस्टच्या रात्री पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठावर स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४ सप्टेंबरला होणाऱ्या एससीओतील संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासोबतच रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राजनाथ सिंह शस्त्रास्त्रे खरेदी आणि सहकार्यावर चर्चा करणार आहेत. या एससीओच्या बैठकीत चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे आणि पाकिस्ताचे संरक्षणमंत्री परवेज खटक हेदेखील येणार आहेत. एससीओच्या देशांमध्ये एकत्रित युद्धसराव होणार होता.

यामध्ये पाकिस्तान आणि चीनदेखील भाग घेणार असल्याने भारताने या युद्धसरावात भाग घेण्यास नकार दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून लद्दाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा शिगेला पोहचला आहे. पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्याच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता या भागात भारतीय लष्कराने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने स्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

लष्कराला या भागात आक्रमक राहण्याची सूचना केली आहे. रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील चारी बाजूला असलेल्या टेकड्यांवर भारताच्या लष्कराने पाय रोवले आहेत. त्यामुळे या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER