
नवी दिल्ली :भारत-चीन (India-China border) सीमेवर निर्माण झालेल्या तणावाची स्थिती दोन्ही देशांत झालेल्या चर्चेनंतर निवळली. दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. या प्रकरणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत दिलेल्या निवेदनावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमीप्रमाणे टीका केली.
भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी राहुल गांधींची हेटाळणी करत त्यांना ‘कुंदबुद्धी, कुंठित, पप्पूजी’ म्हटले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणालेत, पंतप्रधान सैन्य दलाचा अपमान करत आहेत. भारतात कुणालाही असे करण्याची परवानगी देऊ नये. नरेंद्र मोदी चीनसमोर झुकले, डोके टेकले.
आपली जमीन फिंगर ४ पर्यंत आहे. नरेंद्र मोदी यांनी फिंगर ३ पासूनची जमीन चीनला दिली. यावर, राहुल ‘सुपारी’ घेऊन बोलतात, असा आरोप करताना भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणालेत, “कुंदबुद्धी, पप्पूजी दुसरीकडून सुपारी घेऊन देशाची बदनामी करण्याचे षडयंत्र आणि सैन्य दलाचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर काहीही उपाय नाही.”
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला