राज कपूरने केले होते तबस्सुम आणि निम्मीचे नामकरण

चित्रपटातील कलाकारांची मूळ नावे बदलून त्यांना नवे नाव देण्याचा प्रघात फार जुना आहे. तबस्सुम (Tabassum)यांचे चित्रपटासह सगळीकडे नाव तबस्सुम असले तरी त्यांना किन्नी या नावाने ओळखले जाते आणि हे नाव त्यांना राज कपूर यांनीच दिले होते. स्वतः तबस्सुम यांनीच याबाबतची आठवण सांगत नवाब बानोचे निम्मी  (Nimmi)असे  नामकरण कसे झाले त्याची माहिती दिली होती. राज कपूर (Raj kapoor) नेहमीच तबस्सुमच्या आई वडिलांना म्हणत की, मुलीचे इतके कठिण नाव का ठेवले. सोपे सुटसुटीत नाव ठेवायला पाहिजे होते ज्यामुळे तिला हाक मारणे सोपे जाईल. यातूनच त्यांनी तबस्सुमचे नामकरण किन्नी केले. सगळीकडे तबस्सुम यांना लहानपणी किन्नी या नावानेच हाक मारली जात असे. तबस्सुम यांनाही किन्नी नाव आवडू लागले होते.

राज कपूर यांनी बरसात चित्रपटासाठी नवाब बानोला साईन केले. परंतु हे नाव फिल्मी वाटत नसल्याने त्यांनी ते नाव बदलण्याचा विचार केला. असेच एक दिवस राज कपूर तबस्सुमच्या घरी गेले असता तिच्या वडिलांशी बोलताना बरसातमध्ये नव्या मुलीला लाँच करीत असून तिचे नाव नवाब बानो आहे परंतु मी ते बदलू इच्छितो असे म्हटले. तसेच तिचे नाव किन्नी ठेवण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी म्हटले.

मात्र हे ऐकताच तबस्सुम रडू लागली. कारण तबस्सुमला सगळे जण किन्नी म्हणत. आपले नाव दुसऱ्या कोणाला तरी देणार हे लक्षात येताच ती आरडाओरडा करीत रडू लागली. तेव्हा राज कपूर यांनी किन्नीच्या ऐवजी निम्मी नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. राज कपूर यांनी हे नाव सांगताच तबस्सुमचे रडणे थांबले आणि नवाब बानो निम्मी झाली.

ही बातमी पण वाचा : म्हणून या नायिकेला चित्रपटात पुन्हा जीवंत दाखवावे लागले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER