कोरोनामुक्त झालेल्या राजीव सातव यांची प्रकृती खालावली, पुन्हा व्हेटिंलेटरवर; बाळासाहेब थोरात यांची माहिती

Balasaheb Thorat - Rajiv Satav

मुंबई :- काँग्रेस खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव (Rajiv Satav) यांनी कोरोनावर मात केली होती; पण त्यांची प्रकृती आज पुन्हा एकदा खालावली असून त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे .

थोरात यांनी आज जहांगीर रुग्णालयात जाऊन सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना थोरात म्हणाले, “माझी आता डॉक्टरांशी चर्चा झाली नाही. मात्र वर्षा गायकवाड या इथेच आहेत. त्यांची डॉक्टरांशी चर्चा झालेली आहे. सातव नॉर्मलवर येत होते. पुन्हा थोडा त्रास झालेला आहे. पण ते लवकरच बरे होतील.” असे थोरात म्हणाले .

दरम्यान १९ एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर २३ तारखेपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तब्येत सुधारत असतानाच काल सातव यांना त्रास झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button